पुणे : 'सह्याद्री देवराईचे' संस्थापक अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांची आज योगेश शेलार यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त नियोजनातून गडकिल्ल्यांवर जास्तीत जास्त वनराई वाढवण्यासाठी वृक्षारोपणाची व्यापक मोहिम राबण्याबाबत चर्चा झाली. यावेळी गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार,सह्याद्री देवराईचे सचिन चांदणे,मुनीर तांबोळी ,गडकिल्ले संवर्धन सेलचे महेंद्र देवघरे, कुणाल शेलार उपस्थित होते.
Fans
Followers